बार्शी शहरात पावसाळापूर्व ओढे-नाल्यांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:21 AM2021-05-23T04:21:47+5:302021-05-23T04:21:47+5:30
बार्शी : येऊ घातलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने बार्शी शहरात ओढे-नाले, गटारे तुंबणार नाही, पाणी तुंबणार नाही, रोगराई पसरू नये म्हणून ...
बार्शी : येऊ घातलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने बार्शी शहरात ओढे-नाले, गटारे तुंबणार नाही, पाणी तुंबणार नाही, रोगराई पसरू नये म्हणून पावसाळापूर्व पूर्वतयारी बार्शी नगर परिषदेमार्फत सुरू केल्याची माहिती नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी दिली.
शहरातील सर्व गटारे, ओढे-नाले यामधील गाळ काढून त्याचा निचरा करणे, स्वच्छता करण्यासाठी लागणारी वाहने, जे.सी.बी. मशीन, स्वच्छता कंत्राटी कामगार, औषधे फवारणी यांच्या साहाय्याने पावसाळापूर्वी २० दिवसांत तातडीने स्वच्छतेची कामे सुरू करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या आहेत.
बार्शी नगर परिषदेमार्फत गटारी ओढे-नाले स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत.
मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, पक्षनेते विजय राऊत, गटनेते दीपक राऊत, आरोग्य सभापती संदेश काकडे, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, आरोग्याधिकारी ज्योती मोरे यांच्या देखरेखीखाली ही कामे सुरू आहेत. १५ दिवसांत तातडीने स्वच्छतेची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
शहरात सोमवार पेठ-भवानी पेठ विभागाचे स्वच्छता निरीक्षक दीपक काकडे, शिवाजीनगर विभागाचे स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, सुभाषनगर विभागाचे स्वच्छता निरीक्षक नितीन शेंडगे, डॉ. प्रकाश लंकेश्वर, हर्षल पवार यांच्या मदतीने ही कामे करून घेत आहेत.
---
२१ बार्शी
बार्शी शहरात पावसाळापूर्व ओढे, नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.