सोलापुरातील गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 02:40 PM2018-11-13T14:40:55+5:302018-11-13T14:42:16+5:30
सोलापूर : मागील वीस दिवसांपासून मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयश्री सदानंद हक्के (वय ३३, रा़ घोंगडे ...
सोलापूर : मागील वीस दिवसांपासून मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयश्री सदानंद हक्के (वय ३३, रा़ घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) या गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
जयश्री ही पाच महिन्याची गरोदर होती़ वीस दिवसांपूर्वी सर्दी, ताप आजराची लक्षणे होती़ खासगी रुग्णालयात उपचार करुनही बरी होत नसल्यासने तिला मार्कं डेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तज्ज्ञांनी केलेल्या चाचण्यांमध्ये तिला स्वाईन फलूची लागण झाल्याचे निदर्शनास आले़ तिच्यावर शर्थीचे प्रयत्न सुरु होते़.
सोमवारी तिचा मृत्यू झाला़ तिच्या पश्चात पती, दीड वर्षांचा मुलगा, सासू-सासरे आणि दीर असा परिवार आहे़ तापमानाची तीव्रता वाढत असतानाही जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत़ आॅक्टोबर महिन्यात जीवघेण्या तापाचे १६ रुग्ण दाखल झाले होते़ त्यापैकी बहुतांश रुग्ण बरे झाले़ याबरोबरच जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे ७२ रुग्ण दाखल झाले होते़