फळांच्या राजाची वेळेपूर्वीच बाजारात एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:34+5:302021-04-18T04:21:34+5:30
सध्या तालुक्यातील आंबा देशभरातील बाजारपेठेबरोबरच आखाती देशातील बाजारातही निर्यात होताना दिसत आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले मिळणार असून बाजारभावही ...
सध्या तालुक्यातील आंबा देशभरातील बाजारपेठेबरोबरच आखाती देशातील बाजारातही निर्यात होताना दिसत आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले मिळणार असून बाजारभावही सुस्थितीत असल्यामुळे आंबा उत्पादकांना यंदा चांगले उत्पादन मिळणार आहे.
आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधले जाते. अनेक गावांमध्ये जमिनीचे मोठे बांध, ओढ्याच्या काठावर गावठी आंब्यांच्या आमराई प्रसिद्ध होत्या. मात्र, अलीकडील काळात आंब्याच्या संकरीत जातींचा प्रसार झपाट्याने झाला.
यामध्ये प्रामुख्याने केशर, हापूस, तोतापुरी, पायरी अशा अनेक जातीच्या आंब्यांची लागवड बऱ्याच ठिकाणी करण्यात आली आहे. या आंब्याच्या बागेतील आंबे परिपक्व झाल्यामुळे विविध ठिकाणचे व्यापारी आंबा तोडणी करून त्याची प्रतवारी करून आवश्यक त्या बाजारपेठांमध्ये वितरित करण्यात मग्न झाले आहेत.
आंबा उत्पादकांना निसर्गाची साथ
अलीकडील काळात आंबा शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी हवामानातील अनिश्चिततेमुळे आंबा बहार आल्यापासून उत्पादन होईपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यामध्ये ढगाळ हवामानामुळे मोहरगळ, वादळी वारे, अवकाळी गारपिटीमुळे होणारे आंब्याचे नुकसान व बाजारभावातील अनिश्चितता यामुळे आंबा उत्पादकांना निसर्गाच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, यावर्षी निसर्गाने आंबा उत्पादकांना साथ दिली असल्यामुळे यावर्षी आंबा उत्पादकांना अपेक्षित उत्पादन हाती येणार आहे.
फोटो
:::::::::::::::::
गोरडवाडी येथील फरांदे यांच्या शेतातील आंबा प्रतवारी करताना सुरू आसलेली लगबग.