कोरोना महामारीतच अवकाळीची स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:31+5:302021-04-15T04:21:31+5:30
दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाची बळीराजाकडे वक्रदृष्टी फिरवली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे चाऱ्याच्या पिकांची विल्हेवाट ...
दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाची बळीराजाकडे वक्रदृष्टी फिरवली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे चाऱ्याच्या पिकांची विल्हेवाट लागणार असून वादळी वारे, विजा व गारपीट यामुळे संभाव्य नुकसानीची धास्ती तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये झाडांची पडझड व द्राक्ष, केळी यासह सध्या प्रमुख पिक असलेल्या आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अद्याप नुकसान झाले नसले तरी काही महत्त्वाच्या फळबागा अवकाळीच्या रडारवर असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोट :::::::::::::::::
सध्या अवकाळी पावसाचा जोर वाढला असून सध्या तालुक्यात थोड्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र मोठ्या पावसाचा तडाखा बसला तर आंबा, द्राक्षासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
- दीपक गोरड
शेतकरी, गोरडवाडी
फोटो : माणकी (ता. माळशिरस) येथील गुलाब निंबाळकर यांच्या बागेतील नारळाच्या झाडावर विज पडून आग लागल्याचे दिसत आहे.