मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:12+5:302020-12-16T04:37:12+5:30

सांगोला तहसील कार्यालय निवडणूक शाखेकडून ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना, सदस्य संख्या, स्त्री-पुरुष मतदारांच्या अंतिम याद्या बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. ...

Preparations for 61 Gram Panchayat elections have come to an end | मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला आला वेग

मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला आला वेग

Next

सांगोला तहसील कार्यालय निवडणूक शाखेकडून ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना, सदस्य संख्या, स्त्री-पुरुष मतदारांच्या अंतिम याद्या बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदारांची संख्या वाढल्याने प्रभाग रचनेतही बदल झाले आहेत. त्यामुळे निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सदस्य संख्याही वाढली आहे.

ग्रामपंचायत प्रभाग व कंसात सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - हातीद ५ (१३), हटकर-मंगेवाडी ३ (७), राजुरी ३ (९), वाटंबरे ५ (१३), जुजारपूर ४ (११), उदनवाडी ५ (१३), महूद ६ (१८), महिम ५ (१५), कटफळ ४ (११), इटकी ३ (७), लोटेवाडी ४ (११), शिवणे ५ (१३), एखतपूर ५ (१३), अचकदाणी ३ (९), लक्ष्मीनगर ३ (९), गायगव्हाण ३ (७), खिलारवाडी ३ (९), नाझरा-सरगरवाडी ५ (१५), यलमर-मंगेवाडी ४ (११), अजनाळे-लिगाडेवाडे ५ (१३), वझरे ३ (९), संगेवाडी ३ (९), शिरभावी-मेटकरवाडी ५ (१३), मेथवडे ३ (९), देवळे ३ (७), मांजरी-देवकतेवाडी ४ (११), बामणी ३ (९), धायटी ४ (११), हलदहिवडी ३ (९), जुनोनी ५ (१५), सोमेवाडी ३ (७), गौडवाडी ४ (११), कोळा ६ (१७), चोपडी ५ (१३), बुध्देहाळ ३ (९), किडेबिसरी ३ (९), पाचेगाव बु॥ ४ (११), तिप्पेहाळी ३ (९), वाकी-घेरडी ३ (९), वाणीचिंचाळे ३ (९), जवळा ५ (१५), तरंगेवाडी ३ (९), बुरंगेवाडी ३ (९), भोपसेवाडी ३ (९), आगलावेवाडी ३ (९), हंगिरगे ५ (१३), घेरडी ६ (१७), नरळे-हबिसेवाडी ३ (९), डिकसळ ३ (९), आलेगाव ४ (११), मेडशिंगी-बुरलेवाडी ५ (१३), वासुद ४ (११), कमलापूर ५ (१३), पारे ३ (९), कडलास ६ (१८), मानेगाव ३ (९), निजामपूर ३ (९), डोंगरगाव ३ (९), अकोला ५ (१५), लोणविरे ३ (९), हनमंतगाव ३(९) अशा एकूण ६१० प्रभागातून ६६६ सदस्य निवडले जाणार आहेत.

Web Title: Preparations for 61 Gram Panchayat elections have come to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.