शिवजन्मोत्सवाची तयारी...थाट सोलापुरी...; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टीकर्सने सोलापुरातील तरूणाईचे मोबाईल्स सजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:46 PM2019-02-04T16:46:23+5:302019-02-04T16:48:31+5:30
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आता मोबाईल स्टीकरवर पाहता येणार आहेत. भावमुद्रा टिपताना मॅट अन् ग्लॉस इंकचा ...
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आता मोबाईल स्टीकरवर पाहता येणार आहेत. भावमुद्रा टिपताना मॅट अन् ग्लॉस इंकचा पुरेपूर वापर केला आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील मोबाईल शॉपीमध्ये स्टीकर खरेदीसाठी युवकांची गर्दी होत आहे.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. तत्पूर्वी शहरात विविध उपक्रमांच्या आयोजनाची तयारी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मोबाईल शॉपीमध्ये छत्रपतींचे विविध भावमुद्रा असलेले स्टीकर पाहावयास मिळत आहे. या स्टीकरच्या माध्यमातून राजे छत्रपतींचे स्मरण तर होईलच, शिवाय त्यांची शिकवणही आजच्या युवा पिढींना मिळणार आहे.
मोबाईल शॉपीमध्ये मिळणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध भावमुद्रा असलेले हे स्टीकर मुंबई, पुणे येथून मागविण्यात आल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.
हे स्टीकर्स खरेदी करण्यासाठी आता सोलापुरातील तरूणाई सरसावली असून, मोबाईलच्या मागच्या बाजूवर आपल्याला जो आकार लागेल, त्या आकारातही स्टीकर उपलब्ध आहेत. याशिवाय मोबाईलच्या रिंगटोनमधूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे जयजयकारही ऐकावयास मिळत आहे.
शिवाजीराजेंची असेही स्मरण होईल- जाधव
- सोलापुरात शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते. सर्वच जाती-धर्मातील युवकांची क्रेझ पाहून मी माझ्या शॉपमध्ये स्टीकर मागविले आहेत. स्टीकरवरील छत्रपतींच्या विविध छटा युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. हे स्टीकर्स खरेदीसाठी मोठ्या संख्येने तरूणांची गर्दी होत आहे, असे विक्रेता स्वप्नील जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.