ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पासाठी तयारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:53+5:302021-04-25T04:21:53+5:30
बार्शी तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आयोजित बैठक झाली. या बैठकीस खा. ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, आ. ...
बार्शी तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आयोजित बैठक झाली. या बैठकीस खा. ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. दिलीप सोपल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, काँग्रेसचे जीवनदत्त आरगडे, राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, प. स. सदस्या अनिल डिसले, जि. प. सदस्य मदन दराडे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी बार्शी शहर आणि परिसरातील कोरोना परिस्थिती, उपलब्ध बेड संख्या, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा, लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. बार्शीतून बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, या सर्व रुग्णांना बार्शीत उपचार देता यावेत यासाठी प्रयत्न करायला हवा. बार्शीत होम आयसोलेशनऐवजी जास्तीत जास्त रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, असेही त्यांनी सूचित केेले.
यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, वैद्यकीय अधीक्षिका शीतल बोपलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, नोडल अधिकारी डॉ. पवन गुंड, सपोनि. शिवाजी जायपात्रे उपस्थित होते.
----
चुका बाजूला ठेवूयात
रेमडेसिविरचा तुटवडा आहे. त्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत. हे संकट मोठे आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. संकटकाळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करू. एकमेकांच्या चुका बाजूला ठेवून कोरोना कमी होऊन रुग्णांना चांगली सेवा कशी मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
आणखी कोविड सेंटर सुरू करू
पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करून त्याठिकाणी उपचार दिले जातील, तसेच ग्रामीण भागात आणखी सेंटरची संख्या वाढवली जाईल.
त्यासाठी आवश्यक नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरची भरती सुरू आहे. यासाठी आणखी जाहिरात काढू. प्रसंगी संबंधित गावातील खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करू, असे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यावेळी म्हणाले.