सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:34 PM2018-12-18T14:34:06+5:302018-12-18T14:38:19+5:30
सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, ...
सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, गाणी, कथा, नाटकांची युवा-युवतींमधून तयारी सुरू झाली आहे.
दर रविवारी प्रार्थनेसाठी येणाºया ख्रिस्त बांधवांची आता प्रार्थनास्थळांमध्ये नाताळाच्या निमित्ताने गर्दी होऊ लागली आहे़ प्रत्येक चर्चकडून २० डिसेंबरपासून ते १ जानेवारी पर्यंतच्या धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची रुपरेषा, वेळापत्रक आखण्याचे काम सुरु आहे़ काही प्रार्थनास्थळांमध्ये रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत़ अशी परिस्थिती ख्रिस्ती बांधवांच्या घरीही दिसते आहे़ याबरोबरच दिवाळीप्रमाणे खाद्य पदार्थ, फराळ बनवण्याचे काम सुरू आहे़ काही कुटुंबात कपडे खरेदीही सुरू झाली आहे़
प्रार्थनास्थळांमध्ये २६ डिसेंबरपासून प्रवचन
- शहरात २६ डिसेंबरपासून ख्रिस्तेतर बांधवांसाठीही काही प्रार्थनास्थळांमध्ये प्रवचन असते़ या ख्रिस्तेतर बांधवांना कधी निमंत्रण नसते; मात्र इतर धर्मियांची आपुलकी आणि श्रद्धा, प्रेम म्हणून हे लोक प्रार्थनास्थळात येतात, प्रवचन ऐकतात आणि चहा व मिठाई देऊन त्यांचे स्वागतही केले जाते़ तसेच ख्रिस्त बांधवांसाठी दररोज सायंकाळी विकास रणशिंगे हे प्रवचन देणार आहेत़ याची तयारी झाली आहे.
विद्यार्थ्यांकडून येशू जन्मावर नाटिका
- दी फर्स्ट चर्चसह अनेक चर्चमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे़ सोमवारी आणि मंगळवारी हिंदुस्थानी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी भगवान येशू जन्मावर नाटिका सादर करणार केले. याबरोबरच बुधवार आणि गुरुवारी सेंट जोसेफचे विद्यार्थी देखील येशू जन्मावर नाटिका सादर करणार आहेत़ याची शाळांमधून तयारी सुरु झाली आहे़
२४ डिसेंबरपासून कॅरल सिंगिंग
- युवा-युवतींची एक फळी घरोघरी जाऊन सायंकाळी येशू जन्माची गाणी गातात़ याला कॅरल सिंगिंग असे संबोधले जाते़ २४ डिसेंबरपासून या कॅरल सिंगिगला सुरुवात होत आहे़ आबालवृद्ध नव्या पिढीला कथेच्या माध्यमातून येशू समजावून सांगितला जातो. या युवकांच्या फळीबरोबर एक सांताक्लॉज (सेंट निकोलस) ही असतो़ हा येताच दारात लहान मुलांचा गलका होतो आणि तो त्यांना चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करतो़