आधी घेतले ‘पांडुरंगा’चे दर्शन, नंतर पाहिले ‘लोकमत अॅग्रोत्सवा’तील प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:06 PM2019-02-15T14:06:21+5:302019-02-15T14:09:50+5:30
पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी ...
पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ मुखी हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या भाविकांनी आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि पुन्हा लोकमत अॅग्रोत्सवातील प्रदर्शन पाहिले.
‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तीर्ण मैदानावर सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाºया ‘लोकमत अॅग्रोत्सवा’चे आयोजन केले आहे़ त्यानिमित्त शहरातील विविध चौकात लावलेले डिजिटल बॅनर लावलेले आहेत़ ते पाहून माघ वारीसाठी पंढरीत आलेल्या हजारो वारकºयांनी गुरुवारी लोकमत अॅग्रोत्सवात जाऊन विविध स्टॉलवरील माहिती घेतली.
तसेच पांडुरंगाचे दर्शन झाले की बहुतांश वारकरी हे वाखरीतील जनावरांचा बाजार पाहायला जातात़ जाताना वाटेतच पंढरपूर कृृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जाऊन लोकमत अॅग्रोत्सवास काही वारकºयांनी भेट दिली़ वारकºयांनी या ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाचे विविध प्रकार, लांब लचक शेवगा शेंग, भली मोठी पपई, अॅपल बोर, पेरू, चिक्कू आदीची पाहणी करून त्याच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतची माहिती घेतली.
काही वारकºयांनी जैन इरिगेशन कंपनीतर्फे सौर ऊर्जेवरील शेतीचा मॉडेल पाहिला़ इतकेच नव्हे तर पाणी देण्याचे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन याचेही प्रात्यक्षिक पाहिले़ त्यानंतर बी-बियाणे, कृषी अवजारे, खाद्य पदार्थ, विविध आजारावरील आयुर्वेदिक व जडीबुटीच्या औषधाची पाहणी करून काहींनी ते खरेदीही केले.
फळबागांच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती असणाºया पुस्तकाच्या स्टॉलला भेट देऊन ती खरेदीही केली़ पशुखाद्याची माहिती जाणून घेतली़ एकूणच काय तर वारकºयांना गुरुवारी पांडुरंगाचे दर्शन तर झाले पण लोकमत अॅग्रोत्सवात कृषीसंदर्भात माहिती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांच्या चेहºयावरील भाव पाहिल्यानंतर लक्षात आले़
‘लोकमत अॅग्रोत्सवा’त माऊली माऊली...
- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर लोकमत अॅग्रोत्सवाचे कृषी प्रदर्शन सुरू आहे़ पंढरीत दाखल झालेल्या अनेक वारकºयांनी गुरुवारी दुपारनंतर या कृषी प्रदर्शनास भेट दिल्यामुळे अचानक गर्दी झाली़ त्यामुळे या वारकºयांना रांगेतून स्टॉलवरील माहिती घ्यावी लागली़ पुढे कोणते स्टॉल आहे, याची उत्सुकता प्रत्येक वारकºयांना होती़ त्यामुळे रांग पुढे सरकताना नाव न घेता ‘ओ माऊली, ओ माऊली चला पुढं, व्हा पुढं’ असे बोलणे सुरू झाले़ त्यामुळे या ठिकाणी माऊली़़़ माऊलीचा शब्द अनेकांच्या कानी पडला़