करवाढ नसलेला कुर्डूवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:30 PM2018-02-28T14:30:11+5:302018-02-28T14:30:11+5:30

सन २०१७-१८ चा सुधारित व सन २०१८-१९ या वित्तीय वर्षाच्या आरंभीच्या शिलकेसह ३१ कोटी ४४ लाख ७३ हजार २४८ रुपये जमेच्या बाजूचा व ३१ कोटी ३५ लाख २८ हजार ५०० रुपये खर्चाचा असा एकूण नऊ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प कुर्डूवाडी नगरपालिका विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

Presenting the budget for non-taxed Kurdawadi Municipal Council | करवाढ नसलेला कुर्डूवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नसलेला कुर्डूवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसंकल्प प्रशासनाच्या वतीने प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रवी वाघमारे व लेखापाल योगेश खराडकर यांनी सादर केलाहा अर्थसंकल्प कसलीही दरवाढ व करवाढ नसलेला सादर करण्यात आला असून, ९ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिलकीत असल्याचे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी सांगितले.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि २८ : सन २०१७-१८ चा सुधारित व सन २०१८-१९ या वित्तीय वर्षाच्या आरंभीच्या शिलकेसह ३१ कोटी ४४ लाख ७३ हजार २४८ रुपये जमेच्या बाजूचा व ३१ कोटी ३५ लाख २८ हजार ५०० रुपये खर्चाचा असा एकूण नऊ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प कुर्डूवाडी नगरपालिका विशेष सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष समीर मुलाणी होते.
प्रारंभिक शिल्लक ७ कोटी ७० लाख ८४ हजार २४३ रुपये असून, नगरपालिका दर व कर विभागातून ३ कोटी ९८ लाख ९४ हजार ५ रुपये, विशेष अधिनियमाखालील वसुली ६७ लाख ५० हजार, नगरपालिका मालमत्ता व उपयोगिता सेवापासून प्राप्त महसूल व कर आकारणी व्यतिरिक्त शक्ती ४४ लाख ७५ हजार, अनुदाने व अंशदाने १८ कोटी २ लाख ६० हजार, संकीर्ण ६० लाख १० हजार रुपये असे एकूण ३१ कोटी ४४ लाख ७३ हजार २४८ रुपये जमेच्या बाजूने दर्शविण्यात आले आहेत.
खर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन व कर वसुली खर्च २ कोटी ३३ लाख ५५ हजार १०० रुपये, सार्वजनिक सुरक्षितता ६१ लाख रुपये, आरोग्य व सोयी ५ कोटी २४ लाख २३ हजार ४०० रुपये, शिक्षणासाठी ४ लाख ५० हजार, अनुदाने व अंशदाने १८ कोटी १३ लाख ३५ हजार रुपये, संकीर्णसाठी ४ कोटी ९८ लाख ६५ हजार रुपये असा एकूण ३१ कोटी ३५ लाख २८ हजार ५०० रुपये खर्च दर्शविण्यात आला असून, ९ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिल्लक दाखविण्यात आले आहेत़
यावेळी गटनेते बबनराव बागल, बापूसाहेब जगताप, संजय गोरे, सूरज जगताप, अरुण काकडे, आयुब मुलाणी, आनंद टोणपे, प्रकाश गोरे, वनिता सातव, शहनाज मुलाणी, अनिता साळवे, जनाबाई चौधरी, नंदा वाघमारे, दमयंती सोनवर, राधिका धायगुडे आदी          नगरसेवक उपस्थित होते. हा अर्थसंकल्प प्रशासनाच्या वतीने प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रवी वाघमारे व लेखापाल योगेश खराडकर यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प कसलीही दरवाढ व करवाढ नसलेला सादर करण्यात आला असून, ९ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिलकीत असल्याचे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी सांगितले.

Web Title: Presenting the budget for non-taxed Kurdawadi Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.