विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:25+5:302021-09-27T04:24:25+5:30
अमली पदार्थाचा विक्रेता लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : विद्यार्थी संघटनेचा स्वंयघोषित प्रदेशाध्यक्ष असलेल्या अरविन शिवाजी डोळे (रा. वायकर प्लॉट, ...
अमली पदार्थाचा विक्रेता
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : विद्यार्थी संघटनेचा स्वंयघोषित प्रदेशाध्यक्ष असलेल्या अरविन शिवाजी डोळे (रा. वायकर प्लॉट, बार्शी) याने विक्रीसाठी आणलेल्या सव्वादोन किलो गांजासह पोलिसांच्या जाळ्यात आला. त्यास अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी आर.एस. धडके यांच्यासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गजानन कर्णेवाड, पोलीस अंमलदार माळी, गोसावी, मुलाणी यांनी ही कामगिरी केली.
२४ सप्टेंबर रोजी पथकाने कारवाई केली. पोलीस नायक वैभव ठेंगल यांनी फिर्याद दिली आहे. विद्यार्थी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगणाऱ्या डोळे याने यापूर्वी अनके प्रश्नांवर अंदोलने केली होती. तो धस पिंपळगाव रोडवरील कचरा डेपोजवळ डोळे गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तिथे पोहोचले. डोळे हा एक सॅक घेऊन तिथे उभा असल्याचे दिसताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने गांजा बाळगल्याची कबुली देताच सॅकची तपासणी करण्यात आली. दहा हजारांचा सव्वादोन किलो अमली पदार्थ गांजा मिळाला.