राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित पार्वतीबाईंची जगण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:20+5:302020-12-06T04:24:20+5:30

हाताला काम, राहायला घर, व्यवसायासाठी भागभांडवल नाही. अत्यल्प मानधनावर कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे. पतीच्या ...

President's Award-winning Parvatibai struggles to survive | राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित पार्वतीबाईंची जगण्यासाठी धडपड

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित पार्वतीबाईंची जगण्यासाठी धडपड

Next

हाताला काम, राहायला घर, व्यवसायासाठी भागभांडवल नाही. अत्यल्प मानधनावर कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे. पतीच्या निधनानंतर एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. घरात कर्ता पुरुष नसल्याने सर्वच जबाबदारी त्यांच्यावर आहे. संसाराचा गाडा हकताना खूपच अडचणी येत आहेत. इच्छाशक्ती असूनसुद्धा केवळ भागभांडवल नसल्याने आज भाडोत्री घरात राहून इतरांच्या घरी स्वयंपाक करून पोटाची खळगी भरत संसाराचा गाडा हाकत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आजच्या झगमगाट दुनियेत मैंदर्गीतील हस्तकला व्यवसाय बंद पडला आहे. मनात इच्छा असूनही खण-साडी, टॉवेल, बेडशीट, वाॅलपीस इत्यादी वस्त्रे उसनवारी करून तयार केली तरी ती घेणारे कोणी नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले.

देश-विदेशात मैंदर्गीचे नाव आणि खण-साडीचे ब्रँड पोहोचवणाऱ्या पार्वतीबाई आज खूपच हालाखीचे जीवन जगत आहेत. सध्या त्यांना मदतीची गरज आहे. अत्यंत प्रतिभाशाली, हस्तकलेत निपुण असणाऱ्या पार्वतीबाईंना महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

कोट :::::::::::

केंद्र सरकारकडून अत्यल्प मानधन मिळते. सध्या महागाईच्या काळात उदरनिर्वाह करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शासन, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधींकडे मला एक हक्काचे घर आणि वाढीव मानधन मिळावे म्हणून अनेकदा प्रयत्न केला आहे. परंतु कोणीही दखल घेतली नाही. सध्या हस्तकलेचे काम करण्याची इच्छा असूनही केवळ भागभांडवलाअभावी हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. तरी मायबाप सरकारने मला न्याय मिळवून द्यावा, हीच अपेक्षा आहे.

- पार्वतीबाई नागठाण,

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या

फोटो

०५ मैंदर्गी०१

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले छायाचित्र अन् प्रमाणपत्र असून काय उपयोग, जगण्यासाठी मदतीची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करीत चिंताग्रस्त असलेल्या पार्वतीबाई नागठाण.

Web Title: President's Award-winning Parvatibai struggles to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.