लॉकडाऊन असताना चक्क वाढदिवाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:02+5:302021-05-16T04:21:02+5:30
सध्या अक्कलकोट तालुक्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. घ्यावयाचा असल्यास पोलिसांचा परवाना घेणे बंधनकारक ...
सध्या अक्कलकोट तालुक्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. घ्यावयाचा असल्यास पोलिसांचा परवाना घेणे बंधनकारक आहे. तरीही १४ मे रोजी रात्री बसलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयात लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. याबाबतची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलीस अधीक्षक डॉ. तेजस्वी सातपुते यांना दिली. त्यावरून सातपुते यांनी तात्काळ अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. घटनास्थळी जाऊन पाहिले असता जेवण सुरू होते. त्यामुळे मंगल कार्यालय मालक शिवाजी लोखंडे यांना १० हजार, तर आयोजक उत्तम गायकवाड यांच्याकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तसेच मंगल कार्यालय पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे. कारवाई पथकात डीवायएसपी संतोष गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, पोलीस नाईक धनराज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन खंडागळे, गजानन शिंदे, कन्हैया डोळे, अजय बहिरगुंडे, तलाठी मुजावर यांनी केली.
कोट :::::::::
अक्कलकोट येथील एका मंगल कार्यालयात कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जाऊन पाहिले
असता, विनापरवाना कार्यक्रम सुरू ठेवून संचारबंदीचे उल्लंघन करीत होते. यावरून मंगल कार्यालय मालक लोखंडे, आयोजक गायकवाड यांना दंड ठोठावून मंगल कार्यालयाला सील केले आहे.
- डॉ. संतोष गायकवाड,
उपविभागीय पोलीस अधिकारी
फोटो
१५अक्कलकोट-क्राइम
ओळ
अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयास दंड करून सील करताना डीवायएसपी डॉ. संतोष गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, तलाठी मुजावर आदी.