‘बाप्पा'चा उत्सव गोड व्हावा म्हणून सोलापुरात २९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By रवींद्र देशमुख | Published: September 27, 2023 05:28 PM2023-09-27T17:28:19+5:302023-09-27T17:29:46+5:30

गणपती विसर्जनाआधी सोलापूर पोलीस अँक्शन मोडमध्ये... 

Preventive action against 2900 people to prevent disruption of Ganesh Visarjan on Anant Chaturdashi | ‘बाप्पा'चा उत्सव गोड व्हावा म्हणून सोलापुरात २९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

‘बाप्पा'चा उत्सव गोड व्हावा म्हणून सोलापुरात २९०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext

रवींद्र देशमुख, सोलापूर: वर्षातून एकदा मोठ्या दणक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात ‘विघ्नहर्त्या’ बाप्पाचा उत्सव गोड व्हावा म्हणून ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उत्सवात विघ्न आणू शकतील अशा २९०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ‘श्री’ची प्रतिष्ठापना होण्यापूर्वीच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेऊन लोकांना प्रबोधन केले. पोलीस ठाण्याच्या रेकार्डवर ज्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत. ज्यांच्या दहशतीमुळे उत्सवाला गालबोट लागू शकते या सर्वांची यादी तयार करण्याच्या सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार या यादीनुसार त्यांच्यावर विविध कलमान्वये २९०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.

या कलमान्वये कारवाई

  • कलम १४१ : २३५९ आरोपी
  • कलम १४२ : १४२ आरोपी
  • कलम १४४-२ : ४०७ आरोपी

Web Title: Preventive action against 2900 people to prevent disruption of Ganesh Visarjan on Anant Chaturdashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.