उडदाचा रुबाब वाढला, उच्चांकी मिळाला ८ हजार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:38+5:302021-08-17T04:27:38+5:30

सोमवारी उडीद ३०० बॅग, तर मूग २०० बॅग आवक झाली. कर्देहळळीचे शेतकरी प्रकाश पवार यांचा उडीद सर्वाधिक ८ हजार ...

The price of Udda increased, the price reached 8,000 | उडदाचा रुबाब वाढला, उच्चांकी मिळाला ८ हजार भाव

उडदाचा रुबाब वाढला, उच्चांकी मिळाला ८ हजार भाव

Next

सोमवारी उडीद ३०० बॅग, तर मूग २०० बॅग आवक झाली. कर्देहळळीचे शेतकरी प्रकाश पवार यांचा उडीद सर्वाधिक ८ हजार ११२ रुपये प्रति क्विंटलने विकला. यंदा उडीद व मुगाला चांगला दर राहील असे आडते सोमनाथ माळी यांनी सांगितले. हा सोलापूरसह जवळपासच्या बाजार समितीत मिळालेला उच्चांकी दर आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीत उडदाला ७ हजार ६५० रुपये इतका दर मिळाला होता.

सोमवारी सोलापूर बाजार समितीत उडीद कमीतकमी ७ हजार २०० रुपये, तर सर्वाधिक ८१०० प्रति क्विंटल, मुग ५ हजार ८४५ ते ६,४३५ रुपये प्रति क्विंटल दराने, हरभरा ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयाने विक्री झाला. उडदाला हमी भाव ६, ३०० रुपये, मूग ७, २७५ रुपये, तर हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये आहे.

----

Web Title: The price of Udda increased, the price reached 8,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.