कंदर येथे शिक्षण परिषदेत शाळांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:25 AM2021-09-26T04:25:15+5:302021-09-26T04:25:15+5:30
जेऊर : सप्टेंबर २०२१ ची कंदर केंद्राची ऑफलाईन शिक्षण परिषद वडशिवणे येथील अजित पवार विद्यालय येथे पार पडली. याप्रसंगी ...
जेऊर : सप्टेंबर २०२१ ची कंदर केंद्राची ऑफलाईन शिक्षण परिषद वडशिवणे येथील अजित पवार विद्यालय येथे पार पडली. याप्रसंगी करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट शाळांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी अनिल बदे, केंद्र प्रमुख साईनाथ देवकर, मुख्याध्यापक भोसले, फंड, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. केंद्र प्रमुख साईनाथ देवकर यांनी प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग , अनिल बदे, सखाराम राऊत, शहाजी बादल, रमेश कोडलिंगे, अनंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत वडशिवणे,सातोली,पन्हाळकर वस्ती,पुनर्वसन कंदर,पांगरे या शाळांचा सन्मान सभापती अतुल भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमंगल पतसंस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नमाला होरणे यांचा सत्कार करण्यात आला.
------
फोटो : २५ कदंर
कंदर येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी अनिल बदे, केंद्र प्रमुख साईनाथ देवकर, मुख्याध्यापक भोसले,