तिरुपतीचे पुजारी, अलाहाबादचे आचारी अन् तामिळनाडूचे अलंकार सेवेकरी सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:24 PM2019-11-06T13:24:05+5:302019-11-06T13:26:20+5:30

सोलापुरात ब्रह्मोत्सवास प्रारंभ : देवस्थानात विधिवत पूजेला सुरुवात

Priests of Tirupati, Acharyas of Allahabad and ornamental servants of Tamil Nadu in Solapur | तिरुपतीचे पुजारी, अलाहाबादचे आचारी अन् तामिळनाडूचे अलंकार सेवेकरी सोलापुरात

तिरुपतीचे पुजारी, अलाहाबादचे आचारी अन् तामिळनाडूचे अलंकार सेवेकरी सोलापुरात

Next
ठळक मुद्देतिरुपतीच्या धर्तीवर दाजीपेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात आजपासून ब्रह्मोत्सवास प्रारंभ ब्रह्मोत्सव पार पाडण्यासाठी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच तामिळनाडू राज्यातील सेवेकरी भगवान व्यंकटेश्वर तसेच माता पद्मावती यांची विधिवत पूजा करण्यासाठी तिरुपती येथून पुजाºयांचे एक पथक

सोलापूर : तिरुपतीच्या धर्तीवर दाजीपेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात आजपासून ब्रह्मोत्सवास प्रारंभ झाला आहे़ ब्रह्मोत्सव पार पाडण्यासाठी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच तामिळनाडू राज्यातील सेवेकरी मंगळवारी पहाटे सोलापुरात दाखल झाले़ ब्रह्मोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रतिवर्षी या सेवेकºयांना देवस्थानकडून बोलावण्यात येते़ सर्व सेवेकरी पुढील सहा दिवस सोलापुरात राहणार आहेत़ सर्व जण दाजीपेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानच्या विश्रामगृहात मुक्कामी आहेत.

ब्रह्मोत्सव संपल्यानंतर प्रत्येक सेवेकºयास पंधरा हजार रुपये मानधन देऊन त्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात येतो़ येथे धार्मिक सेवा बजावण्यात आम्हाला आत्मिक समाधान मिळते आणि सोलापूरकरांकडून मिळणारा मान सुखद आहे, अशा प्रतिक्रिया सर्वच सेवेकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

भगवान व्यंकटेश्वर तसेच माता पद्मावती यांची विधिवत पूजा करण्यासाठी तिरुपती येथून पुजाºयांचे एक पथक आज पहाटे साडेपाच वाजता सोलापुरात दाखल झाले आहे़ तसेच उत्सवमूर्तीची सजावट तसेच आभूषण अलंकार करण्याकरिता तामिळनाडू येथील कारागीर आले आहेत़ तामिळनाडू राज्यातील तिरुवारूर जिल्ह्यातील राजगोपाल स्वामी असे या कारागिराचे नाव आहे़ ते सलग सहा दिवस अलंकार पूजा करणार आहेत.

ब्रह्मोत्सव काळात नैवेद्य तयार करण्यासाठी तसेच पुजाºयांचे भोजन बनवण्याकरिता अलाहाबाद येथील आचाºयांचे पथक सोलापूर मुक्कामी आहे़ दयालू मिश्रा असे या पथक प्रमुखाचे नाव आहे़ तसेच आंध्र प्रदेशातील कर्नुल येथील सनई वाद्य कलापथकाचेही आगमन झाले आहे़ सर्व सेवेकरी पुढील सहा दिवस सोलापुरात राहणार आहेत़ सर्व सेवेकºयांचे पथक दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानच्या विश्रामगृहात मुक्कामी आहे.

मंगळवारी सायंकाळी सात वाजता विविध धार्मिक विधी करून ब्रह्मोत्सवास प्रारंभ करण्यात आला़ सुरुवातीला आराधना पूजा, त्यानंतर स्वस्तीवाचन पूजा, पुण्याहवाचन, रक्षाबंधन, मृत्संग्रहणम्, वास्तुपूजा, अंकुरारोपणम् आदी पूजा करण्यात आल्या़ पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने मंदिर परिसर घुमघुमला. सर्व सेवेकºयांचे आज पहाटे सोलापुरत आगमन झाले़ देवस्थानात उत्साहाचे वातावरण पसरले आहे़ संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली़ गर्भगृहात फुलांचा सजावट करण्यात आला आहे़ उत्सवमूर्तीस पालखीत विराजमान करण्यात आले़ सायंकाळपासून मंदिरात भक्तांची रेलचेल वाढू लागली आहे़ रविवार दहा नोव्हेंबरपर्यंत पूर्व भागातील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रह्मोत्सव सोहळा चालणार आहे़ रात्री उशिरापर्यंत धार्मिक विधी सुरू होते़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली, उपाध्यक्ष रायलिंग आडम, सचिव राजेशम येमूल, सहसचिव व्यंकटेश चिलका, लक्ष्मीनारायण कमटम, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, गोविंद बुरा, श्रीनिवास बोद्धूल आदी उपस्थित  होते.

धार्मिक ऋणानुबंध
- तिरुपती येथील ज्येष्ठ पुरोहित यज्ञाचार्य चिलकापाटी तिरुमलाचार्य यांच्या देखरेखीत ब्रह्मोत्सवातील धार्मिक कार्य होत आहेत़ गेल्या पंधरा वर्षांपासून तिरुमलाचार्य सोलापुरात ब्रह्मोत्सवाकरिता येत आहेत़ त्यांना प्रतिवर्षी पंचवीस हजारांचे मानधन दिले जाते़ त्यांच्यासोबत तिरुपती येथील पुरोहित गोकुळ स्वामी, अविनाश स्वामी, श्रीनिवास स्वामी, भार्गव स्वामी पूजाकार्यात व्यस्त आहेत़ 
-  या सर्व पुरोहितांना प्रत्येकी १५ हजारांचे मानधन दिले जाणार आहे़  गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पुरोहित ब्रह्मोत्सवाकरिता येत असल्याने त्यांच्यात आणि येथील भक्तांमध्ये धार्मिक ऋणानुबंध निर्माण झाल्याची माहिती अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली यांनी दिली.

Web Title: Priests of Tirupati, Acharyas of Allahabad and ornamental servants of Tamil Nadu in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.