सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आॅनलाईन कामांवर बहिष्कार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:55 PM2017-12-08T12:55:08+5:302017-12-08T12:56:45+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शिक्षकांचा बराच वेळ आॅनलाईन कामात जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. आॅनलाईन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. या विरोधात शिक्षकांनी आॅनलाईन कामांवर बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाने अद्यापही शिक्षक संघटनांना चर्चेसाठी बोलावलेले नाही. शिक्षकांची नाराजी कायम आहे. हे बहिष्कार आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शनिवार आणि रविवारी तालुका समन्वय समितीच्या बैठकांचे नियोजनही यावेळी करण्यात आले. या बैठकीत शिवानंद भरले, अनिल कादे, मछिंद्रनाथ मोरे, सुधीर कांबळे, इकबाल नदाफ, बाबासाहेब ढगे, अरुण नागणे, नवनाथ धांडोरे, राजाराम चव्हाण, सूर्यकांत हत्तुरे-डोगे, अमोगसिद्ध कोळी, बब्रुवान काशीद, राम बिराजदार, दिनेश क्षीरसागर, ज्योतीराम बोंगे, एजाज शेख, अनिरुद्ध पवार, किरण सगेल, तानाजी बाबर, संजय ननवरे, तानाजी बाबर, हरी कोवेकर, अण्णासो मगर, तातोबा कांबळे, योगेश बारसकर, प्रमोद कुसेकर व संभाजी तानगावडे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------
वेतन रखडणार
च्शिक्षकांच्या या बहिष्कार आंदोलनामुळे मुख्याध्यापकांनीही वेतनपत्रके आॅनलाईन भरून गटशिक्षणाधिकाºयांकडे सादर केलेले नाहीत. या विषयावरही संघटनांच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र पगार करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाºयांची असून त्यांनीच इतर कोणत्याही पर्यायी मार्गाने पगार करावा, पण कोणत्याही परिस्थितीत मुख्याध्यापक आॅनलाईन शालार्थ वेतन प्रणालीत पगार बिल करणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.
------------------------
या कामांवर बहिष्कार
शालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन भरणे, शिष्यवृत्तीचे अर्ज, नवोदय प्रवेशाचे अर्ज, शालार्थ प्रणालीतून आॅनलाईन वेतन काढण्याबाबतचे काम, पायाभूत चाचणीचे गुण भरणे आदी.