उत्तरमधील बचत गटातील महिलांच्या बदलाचे पंतप्रधानांनी केले कौतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:31+5:302021-08-15T04:24:31+5:30
सोलापूर : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारी शक्ती से संवाद’अंतर्गत उमेद अभियानातील ...
सोलापूर : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारी शक्ती से संवाद’अंतर्गत उमेद अभियानातील स्वयंसहायता बचत गटातील महिलांशी थेट संवाद साधला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत ४०० महिला सदस्य गावच्या प्रतिनिधींनी स्वत:मधील बदल सांगितला. या बदलाचे त्यांनी कौतुक केले.
स्वयंसहायता समूहात सहभागी झाल्याने त्यांच्यात झालेला बदल, झालेली प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणून घेतली.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उभारल्या जाणाऱ्या संस्था व होत असलेले बळकटीकरण ऐकून पंतप्रधान मोदी यांनी महिलांचे कौतुक केले. पाथरीत सरपंच लक्ष्मी मळगे यांनी पाथरी गाव आत्मनिर्भर करण्याचा निर्धार केला. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक पूनम दुध्याल, प्रमोद चिंचुरे, सादीक शेख, उषा तोंडसे, वैशाली काळे यांनी परिश्रम घेतले.