टेंभुर्णी येथील जगदंबा लाँजवर छापा, २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना घेतले ताब्यात, ग्रामीण पोलीसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:31 PM2017-11-04T12:31:57+5:302017-11-04T12:32:59+5:30
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील जगदंबा लॉजवर ग्रामीण पोलीसांची शनिवारी पहाटे छापा टाकला़ या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाºया २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले़.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील जगदंबा लॉजवर ग्रामीण पोलीसांची शनिवारी पहाटे छापा टाकला़ या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाºया २ मुलींची सुटका करून ३ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले़ ही कारवाई ग्रामीण पोलीसांनी केली़
पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये टेंभूर्णी येथील जगदंबा लॉजवर डमी कस्टमर पाठवून मुलींची मागणी केली असता येथील दलाल संगीता ऊर्फ मैनाबाई भुजबळ हिने प्रत्येक मुलीचा वैश्यागमन करण्यासाठी १ तासासाठी १ हजार रू दर सांगून तिच्या साथीदाराला फोन करून दोन मुली रिक्षातून मागून घेऊन लॉज मॅनेजर यांच्या मदतीने दोन मुलींना बळजबरीने डमी कस्टमर बरोबर पाठवले असताना सापळा रचून सदर दोन मुलींना ताब्यात घेतले़ घेऊन आरोपी संगीता उर्फ मैनाबाई पांडूरंग भुजबळ (रा बेंबळे ता माढा(दलाल महिला), असिफ रहिमान शेख (रा कुडूर्वाडी (लाँज मॅनेजर), संतोष उत्तम लोंढे रा टेंभुर्णी (रिक्षा ड्रायव्हर) यांना ताब्यात घेऊन सर्व आरोपीं विरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाणेस अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम याखालील गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील परि - पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोनि आनंद खोबरे, स.पो.नि संदीप धांडे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, पो.कॉ बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, अमोल जाधव, अनुप दळवी, सचिन कांबळे, सागर ढोरे पाटील, बालाजी नागरगोजे, लक्ष्मण शेळके, म.पो.काँ अश्विनी दिघे, दिक्षा वाघमारे यांच्या टीमने हे काम केले आहे.