बँकांचे खासगीकरण : आज निदर्शने
By admin | Published: May 23, 2014 01:27 AM2014-05-23T01:27:07+5:302014-05-23T01:27:07+5:30
बँक संघटनांचा विरोध : नायक समितीचा अहवाल अमान्य
सोलापूर : राष्टÑीयीकृत बँकांच्या खासगीकरणाची शिफरस करणार्या पी. जे. नायक समितीच्या अहवालाला बँक संघटनांनी विरोध दर्शविला असून, या अहवालावरील आपला संताप व्यक्त करण्यासाठी येथील बँक कर्मचारी शुक्रवार, दि. २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता बँक आॅफ इंडियाच्या रेल्वे लाईन शाखेसमोर निदर्शन करणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचार्यांचे नेते गजानन मेहंदळे यांनी दिली. नायक समितीच्या अहवालाला बँकांच्या देशभरातील दहा संघटनांनी विरोध दर्शविला आहे. सोलापूर जिल्ह्यात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडिया या दोन्ही संघटनांचा आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्टÑीयीकृत बँकेचे सुमारे तीन हजार कर्मचारी आहेत. या सर्वांचा बँकांच्या खासगीकरणाला विरोध आहे. उद्याच्या आंदोलनात १५०-२०० कर्मचारी सहभागी होतील. बँक, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या हिताचा विचार न करता हा नायक यांनी आपल्या अहवालात शिफरशी केल्या असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्वरूपालाच या अहवालामुळे धोका पोहोचणार आहे, असे मेहंदळे म्हणाले. देशभरातील या आंदोलनावर दृष्टिक्षेप टाकला असता, उद्याच्या आंदोलनात देशातील दहा लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. हे कर्मचारी मुख्यत्वे आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बँक एम्पलॉईज फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक आॅफिसर्स काँग्रेस या संघटनांचे आहेत.
----------------------
कोण आहेत नायक... पी. जे. नायक हे अॅक्सिस बँकेचे माजी चेअरमन आहेत. सध्या ते रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे प्रमुख आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी बँकांच्या खासगीकरणाची शिफरस करणारा अहवाल केंद्र सरकारला सादर केला.
------------------
नायक यांच्या शिफारशी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज एखाद्या कंपनीप्रमाणे असावे बँकांमधील सरकारचे भागभांडवल ५० टक्क्यांपेक्षा कमी असावे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण बँकांची मालकी बँक गुंतवणूक कंपनीकडे हस्तांतरित करणे बँक राष्टÑीयीकरण कायदा आणि एसबीआय कायदा रद्द करणे भागधारकांना मतदानाचा अधिकार देणे