प्रियंका बोलतेय.. ओटीपी नंबर द्या; म्हणत खात्यातून काढले सव्वादोन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:01 PM2019-06-11T14:01:02+5:302019-06-11T14:02:10+5:30

कुर्डूवाडीजवळील भोसरे येथील घटना; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Priyanka speaking .. give OTP number; Sawvodon removes the money from the account saying | प्रियंका बोलतेय.. ओटीपी नंबर द्या; म्हणत खात्यातून काढले सव्वादोन लाख

प्रियंका बोलतेय.. ओटीपी नंबर द्या; म्हणत खात्यातून काढले सव्वादोन लाख

googlenewsNext
ठळक मुद्देयाबाबत महेश गोरे यांच्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालातपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू

कुर्डूवाडी : ‘हॅलो.. मी प्रियंका शर्मा बोलतेय.. पेंटलॉमची स्कीम मंजूर झाली आहे,’ असे सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून डेबिट कार्डवरील ७४ हजार व क्रेडिट कार्डमधून १ लाख ५० हजार अशी २ लाख २४ हजारांची परस्पर रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाएक नंतर राऊत वस्ती, भोसरे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश गोरे हे स्टेट बँक आॅफ इंडिया कुर्डूवाडी शाखेत खातेदार आहेत. ते स्वत: ६ जून रोजी विजय यांना भेटण्यासाठी बँकेत गेले असता त्यांचे व्यवहार पाहून पेंटलॉम गिफ्ट व्हाऊचरची स्कीम समजावून सांगितली, ती योग्य वाटल्याने त्यासाठी आवश्यक कागदपत्रे फिर्यादीने बँकेत नेऊन दिली. दोन दिवसांनी ‘तुम्हाला कंपनीचा फोन येईल’, असे बँकेतून सांगितले. त्यानुसार ८ रोजी फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल आला व ‘मी प्रियंका शर्मा.. एसबीआय के्रडिट कार्ड, शाखा पुणे येथून बोलत आहे, आपले पेंटलॉम गिफ्ट व्हाऊचर मंजूर झाले असून, त्याबाबत माहिती सांगितली व तुमच्या बचत खात्यातील स्कीमसाठी २० हजार रुपये आॅनलाईन कटिंग होईल, अशी माहिती देण्यात आली. फिर्यादीने अटी मान्य असल्याचे सांगितले.

मोबाईलवर आलेल्या संदेशानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु दुसरा शनिवार व रविवार दोन दिवस बँक बंद असल्याने सोमवारी बँकेत जाऊन त्यांनी स्टेटमेंट घेऊन कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दिली. याबाबत महेश गोरे यांच्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तिसºया फोनला  दिला नंबर
 फोनवर ‘तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी कोड आल्यानंतर ते मला सांगा’, असे फिर्यादीला सांगितले होते. त्यानुसार पुन्हा फोन आला. मात्र फिर्यादीने ओटीपी नंबर सांगण्यास नकार दिला. तिसºयांदा पुन्हा कॉल आला व तुम्ही आम्हाला ओटीपी सांगितलं नाही, तर ती स्कीम कॅन्सल होईल, असे सांगितले, म्हणून त्यांना फिर्यादीने ओटीपी कोड सांगितला. त्यानंतर पहिल्यांदा खात्यावरून पैसे कमी होत गेले.

Web Title: Priyanka speaking .. give OTP number; Sawvodon removes the money from the account saying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.