पोळ्याला बैलाऐवजी काढली ट्रॅक्टरची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:28 AM2021-09-09T04:28:12+5:302021-09-09T04:28:12+5:30
बार्शी : शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा वापर वर्षभर केल्याने त्याच्यापासून उत्पन्न मिळते. त्याच्या उतराईसाठी म्हणून ...
बार्शी : शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा वापर वर्षभर केल्याने त्याच्यापासून उत्पन्न मिळते. त्याच्या उतराईसाठी म्हणून आजपर्यंत पोळ्याच्या सणात त्यांना सजवून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे व वरचेवर त्यात बदल झाल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टरने मशागत करू लागल्याने त्याची उतराई करावयाची म्हणून ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्याची प्रथा येऊ लागली. या पोळ्यादिवशी बार्शी तालुक्यातील व्हळे शेलगाव येथे ट्रॅक्टरला फुलांनी सजवून मिरवणूक काढून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला.
अलीकडे बैलजोड्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे बैलजोड्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतीची सर्व कामे आता लहान-मोठ्या ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केली जातात आणि ही काळाची गरज आहे. काही शेतकरी बांधवांकडे अजूनही बैलजोड्या आहेत आणि त्या बैलांची पूजा पोळ्यादिवशी केली जाते; मात्र शेलगाव येथील ऋषिकेश व्हळे व ज्ञानेश्वर व्हळे या दोन मित्रांनी आपल्या ट्रॅक्टरला ढवळ्या पवळ्याची नावे देऊन त्याची सजावट करून गावातून वाजत गाजत ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली.