गुणवत्तेच्या दुधामुळे तोट्यातून नफ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:53+5:302021-06-23T04:15:53+5:30

---- एप्रिल महिन्यात नफा फेब्रुवारी महिन्यात जिल्हा संघाने संकलन झालेल्या दुधात १५०० किलो पावडर (एसएमपी)चा वापर केला होता. तरीही ...

Profit from loss due to quality milk | गुणवत्तेच्या दुधामुळे तोट्यातून नफ्यात

गुणवत्तेच्या दुधामुळे तोट्यातून नफ्यात

googlenewsNext

----

एप्रिल महिन्यात नफा

फेब्रुवारी महिन्यात जिल्हा संघाने संकलन झालेल्या दुधात १५०० किलो पावडर (एसएमपी)चा वापर केला होता. तरीही संघाला या दुधाचा ५ लाख २३ हजार १५ रुपये तोटा झाला होता. मार्च महिन्यात १४४५ किलो पावडर वापरल्यानंतर एक लाख ७५ हजार ७९१ रुपये तोटा झाला होता.

एप्रिल महिन्यात मात्र ३०५ किलो पावडर वापरल्यानंतर एक लाख ७ हजार ५५८ रुपये नफा झाला आहे.

-----

शेतकरी, ग्राहक वाऱ्यावर

खासगी दूध संघ एकजूट करून शेतकऱ्यांकडून लिटरला १८-२० रुपये देऊन दूध खरेदी करतात. सहकारी संघ मोडीत निघू लागल्याने खासगी संघाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. शेतकऱ्यांकडून २० रुपयाने खरेदी केलेले दूध ग्राहकांना ५० रुपयाने विक्री केले जाते. मात्र, विक्रेत्याला (एजंट) अधिक फायदा होईल अशी योजना (स्कीम) दिली जाते. एजंट गुणवत्तेचे दूध विक्री करण्यापेक्षा अधिक पैसे मिळतील असेच दूध विक्रीला ठेवतात.

----

ग्राहकांना ओरिजनल गुणवत्तेचे दूध मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचे दूध कोणीही अन् कधीही तपासले तरी गुणवत्ता दिसली पाहिजे. अप्रमाणित दूध आम्ही स्वीकारणार नाही. पावडरचा वापर पूर्णपणे बंद केला आहे.

- श्रीनिवास पांढरे, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, दूध संघ

----

फोटो- दूध पंढरी..

Web Title: Profit from loss due to quality milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.