शिक्षकांच्या उत्कृष्ट कामामुळे तालुक्याची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:43+5:302021-09-23T04:24:43+5:30

कुर्डुवाडी येथे माढा तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आरोग्य विभागास कोविड उपचारासाठी आवश्यक १२ लाख ...

The progress of the taluka due to the excellent work of the teachers | शिक्षकांच्या उत्कृष्ट कामामुळे तालुक्याची प्रगती

शिक्षकांच्या उत्कृष्ट कामामुळे तालुक्याची प्रगती

Next

कुर्डुवाडी येथे माढा तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आरोग्य विभागास कोविड उपचारासाठी आवश्यक १२ लाख रुपयांच्या साहित्याचे वितरण आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यात १० ऑक्सिजन मशीन ,२० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर ,ऑक्सिमीटर, ग्लुको मीटर, बी.पी.व थर्मल गन, सॅनिटायझर, मास्क ,ग्लोज आदी साहित्य व ४०० शाळांना प्रतिबंधात्मक किट देण्यात आले. यावेळी कार्यक्रमात वृक्ष मित्र शाळा रोपळे (क), विनायक विद्यालय भोसरे,गंगामाईनर येथील शाळांचा सन्मान करण्यात आला. अभ्यासाचे गाव म्हणून सोलंकरवाडी शाळेचा सन्मान करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवाजी थोरात यांचाही कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, माजी उपसभापती बंडू ढवळे, शिक्षक संघटनेचे मनोज पवार ,संजय काशीद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष जाधव यांनी तर सूत्रसंचालन अनिल क्षीरसागर, अतुल देशमुख यांनी केले. तर आभार महादेव जठार यांनी मानले.

.......

फोटो ओळी : कुर्डुवाडी येथे माढा तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने कोविड उपचारासाठी साहित्याचे वितरण करताना आमदार बबनराव शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, भारत शिंदे, बंडू ढवळे आदी.

........

(फोटो २१कुर्डूवाडी)

200921\07475941img-20210920-wa0222.jpg~200921\07475941img-20210920-wa0223.jpg

कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात माढा तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आरोग्य विभागास कोविड उपचारासाठी आवश्यक १२ लाख रुपयांच्या साहित्याचे वितरण आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी इतर मान्यवर व शिक्षक वृंद.~कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात माढा तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आरोग्य विभागास कोविड उपचारासाठी आवश्यक १२ लाख रुपयांच्या साहित्याचे वितरण आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी इतर मान्यवर व शिक्षक वृंद.

Web Title: The progress of the taluka due to the excellent work of the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.