सांगोल्यात ४८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:21+5:302021-01-13T04:57:21+5:30
ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून सांगोला पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. यासाठी सांगोला पोलिसांनी सीआरपीसी १०७ प्रमाणे २८५, सीआरपीसी ...
ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून सांगोला पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. यासाठी सांगोला पोलिसांनी सीआरपीसी १०७ प्रमाणे २८५, सीआरपीसी ११० प्रमाणे ३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तर सीआरपीसी ११४ (२) प्रमाणे २० जणांना हद्दपार, सीआरपीसी १४९ प्रमाणे १४७ जणांना नोटीस बजावली आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम ९३ प्रमाणे ३२ कारवाया, ग्रामपंचायत निवडणूक काळात २५ दारूच्या केसेस, ५ जुगार, अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सांगोला पोलिसांनी कडक पावले उचलली असून, प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
३२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २६५ मतदान केंद्रांवर दोन पोलीस निरीक्षक, तीन सहा. पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, १६५ पोलीस कर्मचारी, १५२ होमगार्ड अशा ३२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तर जवळा, जुनोनी, नाझरे, महूद, सांगोला या पाच झोनलमध्ये पाच फिरती पथके पेट्रोलिंग करणार आहेत.