महापुरुषाच्या विटंबना प्रकाराचे प्रक्षेपण; आंधळकरांसह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:35+5:302021-03-06T04:21:35+5:30

भाऊसाहेब आंधळकर (रा. सौंदरे), इरफान उर्फ फुक्या बागवान (रा. भोगेश्वरी चाळ), जावेद पठाण व अन्वर मुजावर (सर्व रा. बार्शी) ...

Projection of the type of denigration of great men; Crime on four including blind people | महापुरुषाच्या विटंबना प्रकाराचे प्रक्षेपण; आंधळकरांसह चौघांवर गुन्हा

महापुरुषाच्या विटंबना प्रकाराचे प्रक्षेपण; आंधळकरांसह चौघांवर गुन्हा

Next

भाऊसाहेब आंधळकर (रा. सौंदरे), इरफान उर्फ फुक्या बागवान (रा. भोगेश्वरी चाळ), जावेद पठाण व अन्वर मुजावर (सर्व रा. बार्शी) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रशांत जगदाळे (वय ३८,उत्कर्ष कॉलनी, उपळाई रोड बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की २ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते घरी असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया द्वारे समजले की, भाऊसाहेब आंधळकर यांच्या देवणे गल्ली बार्शी येथील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी तोडफोड झाली आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी स्थानिक चॅनलवर पाहिला. पाहिलेल्या व्हिडिओमध्ये आंधळकर यांचे संपर्क कार्यालयाचे ठिकाणी खुर्चा तुटलेल्या दिसत होत्या, त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कार्यालयात आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कुठेही दिसून येत नव्हती. तसेच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्व. मीनाताई ठाकरे यांचा डिजिटल बोर्ड सुस्थितीत होता.

३ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास भाऊसाहेब आंधळकर हे फेसबुकवर लाईव्ह आले. त्यानी त्यांच्या कार्यालयात महापुरुषाची मूर्ती तोडफोड केलेल्या अवस्थेत लाईव्हमध्ये दाखवू लागले. त्याठिकाणी इरफान ऊर्फ फुक्या बागवान, जावेद पठाण, अन्वर मुजावर हे महापुरूषाच्या मूर्तीची विटंबना करत होते. व त्याचे थेट प्रक्षेपण करत होते. ते ज्याप्रकारे महापुरुषाची मूर्ती हाताळत होते. त्यामुळे माझ्या व शिवप्रेमी बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या.

तसेच सदर मूर्ती व डिजिटल पोस्टर त्यांनीच त्यांच्या राजकीय फायद्यासाठी भंग केले व फाडले असा देखील आम्हाला संशय आहे. चित्रीकरण व प्रक्षेपण करुन विटंबना केल्याने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Projection of the type of denigration of great men; Crime on four including blind people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.