नवदाम्पत्यांनी केले वृक्षारोपण
By admin | Published: July 8, 2016 07:04 PM2016-07-08T19:04:33+5:302016-07-08T19:04:33+5:30
विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़
वैराग येथील घटना : अशीही नवजीवनाची सुरुवात
वैराग : विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़
सध्या शासनस्तरावर वृक्ष लागवडीची मोहीम सुरू आहे़ यामध्ये सामाजिक, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत़ परंतु स्वत: वृक्षारोपण करून इतरांना प्रेरणा देण्याचे महत्वपूर्ण काम सत्यवान-शुभांगी या नवदाम्पत्यांनी केले़ इर्ले (ता़ बार्शी) येथील बाळासाहेब शिंदे यांची कन्या शुभांगी व तांदुळवाडी (ता़ माळशिरस) येथील दादासाहेब चव्हाण यांचे चिरंजीव सत्यवान यांचा विवाह गुरुवारी वैराग येथील मातोश्री मंगल कार्यालयात पार पडला़ शुभांगी व सत्यवान यांच्यावर अक्षता पडताच प्रथमत: त्यांनी येथील मैदानात वृक्षारोपण करून रोपाचा आशीर्वाद घेतला़ या उपक्रमामुळे आलेल्या वऱ्हाडी मंडळींसह सर्वांसाठीच त्यांनी हा एक आदर्श घालून दिला आहे़ यावेळी त्यांचे आई-वडील, नातेवाईक, हितचिंतक, वऱ्हाडी मंडळी, माजी सरपंच भारत शिंदे, कार्यालयाचे व्यवस्थापक दिलीप खेंदाड उपस्थित होते़