योग्य संवादाने लवकर आजाराचे निदान होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:32+5:302021-06-20T04:16:32+5:30
करकंब (ता. पंढरपूर) येथे डॉ. बी. पी. रोंगे क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ...
करकंब (ता. पंढरपूर) येथे डॉ. बी. पी. रोंगे क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गंगामाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद निवृत्ती पवार उपस्थित होते. प्रास्ताविक स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांबरोबर त्यांच्या आजारासंबंधी चर्चा-विनिमय करून, योग्य उपचाराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे काम करणार असल्याचे आश्वासन डॉ. स्नेहा रोंगे यांनी दिले.
यावेळी निवृत्त शिक्षक सुभाष हत्तरगे, जि.प. सदस्या रजनी देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी-कोल्हे, प्रा. सतीश देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, डॉ. प्रमोद पवार, सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, सपोनि प्रशांत पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब देशमुख, भाजप जिल्हा सचिव वंदना पंत, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, जि.प. माजी सदस्य बाळासाहेब माळी, नितीन बागल, स्वाभिमानीचे पांडुरंग नाईकनवरे, सुभाष गुळवे, ग्रा.पं. सदस्य राहुल पुरवत, सदस्या कल्पना देशमुख, वैशाली देशमुख, पांडुरंग नगरकर, रघुनाथ जाधव, सुनील झिरपे, पांडुरंग व्यवहारे, लक्ष्मण वंजारी, डॉ. तुषार सरवदे, सतीश खारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. तर डॉ. विश्वास मोरे यांनी आभार मानले.