सामूहिक शेततळ्यासाठी सोलापूर जिल्ह्याचा ५० कोटींचा प्रस्ताव, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरवर चालणाºया अवजारांसाठी तरतूद वाढविण्याची मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:40 AM2018-01-12T11:40:52+5:302018-01-12T11:43:36+5:30
सामूहिक शेततळ्यासाठी ५० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : सामूहिक शेततळ्यासाठी ५० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. राष्टÑीय कृषी विकास योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टरवर चालणाºया अवजार अनुदानासाठी मागणीच्या प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने शेतकºयांची मोठी निराशा होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अद्ययावत शेतीसाठी सरसावला आहे. शेततळे, ठिबक संच, ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत तसेच फवारणी, जनावरांसाठी सुधारित गोठा अशा पद्धतीने शेती करण्यावर शेतकरी भर देऊ लागला आहे. राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी शासनाने ७ कोटी ८९ लाख ९० हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यातून शेती हरितगृह, शेडनेट, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर पॉवर टिलर अवजारे, स्वयंचलित अवजारे, पीक संरक्षण उपकरणे, शेततळे अस्तरीकरण व कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठीची शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्जांची संख्या मोठी असली तरी पूर्वसंमती घेतलेले शेतकरी अवजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. यासाठी शेतकºयांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांसाठी चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.
मागेल त्याला शेततळ्यासाठी अनुदानाची तरतूद केल्याने व जिल्ह्यात लहान शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने सामूहिक शेततळ्यांसाठी अनुदानाची तरतूद केली नव्हती; मात्र जिल्ह्यातील शेतकºयांकडून मोठ्या शेततळ्यांसाठी अनुदानाची मागणी असल्याचे शासनाला कळविण्यात आले होते. शेतकºयांच्या मागणीचा विचार करीत वरिष्ठ कार्यालयाने सामूहिक शेततळ्यासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिल्या आहेत. अद्ययावत शेतीसाठी आवश्यक असणाºया ट्रॅक्टर व त्यावरील अवजारे खरेदीसाठी शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर मागणी अर्ज आहेत. त्यासाठी अनुदानाची तरतूद करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
-------------------
ट्रॅक्टर, पॉवर टिलरची अधिक मागणी
- हरितगृहासाठी ३२१, शेडनेटसाठी ३७५, ट्रॅक्टरसाठी ४ हजार ६७४, ८ एच.पी. पेक्षा कमी पॉवर टिलरसाठी ४७९, ८ एच.पी. पेक्षा अधिकचे पॉवर टिलरसाठी ८२८, अवजारांसाठी ९६७, उपकरणासाठी ४२३, शेततळे अस्तरीकरणाचे १ हजार १८ व कांदा चाळीसाठी ३४१३ असे एकूण १३ हजार ८४९ अर्ज आले होते. त्यापैकी पूर्वसंमती दिलेले शेतकरी मंजूर साहित्य खरेदी करुन अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास प्रतिसाद देत नसल्याने अर्ज घेऊन साहित्य खरेदीला संमती दिली जात आहे. त्यामुळे राष्टÑीय कृषी विकास योजनेचे संपूर्ण अनुदान खर्च होईल असा कृषी खात्याचा अंदाज आहे.
------------------
सामूहिक शेततळ्यासाठी अनुदानाची मागणी जिल्ह्यातून आहे. जिल्हाभरात फळबागा असणारे शेतकरी ठिबक व शेततळ्याचे सर्रास प्रस्ताव देत आहेत. ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अवजारासाठी तरतूद वाढविण्याची गरज असल्याचे वरिष्ठांना कळविले आहे.
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी