टांगा मोर्चा काढून पंढरीत गॅस दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:33+5:302021-07-03T04:15:33+5:30

पंढरपूर : मागील एक महिन्यापासून केंद्र सरकारकडून टप्प्याने वाढविण्यात येत असलेले डिझेल, पेट्रोल, गॅसचे दराने इतिहासातील नवा उच्चांक गाठला ...

Protest against gas price hike in Pandharpur | टांगा मोर्चा काढून पंढरीत गॅस दरवाढीचा निषेध

टांगा मोर्चा काढून पंढरीत गॅस दरवाढीचा निषेध

Next

पंढरपूर : मागील एक महिन्यापासून केंद्र सरकारकडून टप्प्याने वाढविण्यात येत असलेले डिझेल, पेट्रोल, गॅसचे दराने इतिहासातील नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे. याच्या निषेधार्थ पंढरपूर राष्ट्रवादी तर्फे केंद्रसरकारविरूद्ध छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातून टांगा मोर्चा काढून मोदी सरकारला इशारा देण्यात आला.

पश्चिम बंगालसह पाच राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलमध्ये जवळपास २५ रूपये, डिझेलमध्ये १० रूपये व गॅसमध्ये ही मोठी दरवाढ करण्यात आली आहे. याशिवाय खाद्यतेलाच्या किमतीसह विविध वस्तूंचे दरही रोजच्या रोज वाढविले जात आहेत. सध्या कोरोनाचे संकट आहे. या काळात दर स्थिर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असताना मोदी सरकार दर वाढवून सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाष भोसले, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, नागेश फाटे, अरूण कोळी, संदीप मांडवे, किरण घाडगे, प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी, अनिल अभंगराव, संजय बंदपट्टे, मोहम्मद वस्ताद, आप्पा राऊत, सूरज पावले, रशीद शेख, दिगंबर सुडके, निलेश कोरके, रंजना हजारे, साधना राऊत, चारूशीला कुलकर्णी, राधा मलपे, कीर्ती मोरे, पूजा कोळी, अविंदीता गायकवाड यांच्यासह शहर व ग्रामीण कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

----

पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी तर्फे इंधन दरवाढ आंदोलन केले. यावेळी कल्याणराव काळे, सुभाष भोसले, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सुग्रीव कोळी आदी.

Web Title: Protest against gas price hike in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.