माढा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने महागाईविरोधात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:36+5:302021-07-07T04:27:36+5:30
भीमानगर : इंधन दरवाढ व वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीतर्फे माढा तालुक्यामध्ये निषेध करण्यात आला. हा जाहीर ...
भीमानगर : इंधन दरवाढ व वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीतर्फे माढा तालुक्यामध्ये निषेध करण्यात आला. हा जाहीर निषेध जि.प. सदस्य रणजीतसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेला खोटी आश्वासने देत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली असून पेट्रोल-डिझेल तसेच गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण केले आहे, असा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर कमी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या वेळी जि.प. सदस्य रणजीतसिंह शिंदे, माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, जि.प. सदस्य बंडू नाना ढवळे, जि.प. सदस्य शिवाजीराव पाटील, टेंभुर्णी सरपंच प्रमोद कुठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
---