फिसरे, कोंढार चिंचोली परिसरात टायर पेटवून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:25+5:302021-05-27T04:24:25+5:30

उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाण्याचा निर्णय जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रद्द झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. मात्र, ...

Protest of government by burning tires in Fisare, Kondhar Chincholi area | फिसरे, कोंढार चिंचोली परिसरात टायर पेटवून शासनाचा निषेध

फिसरे, कोंढार चिंचोली परिसरात टायर पेटवून शासनाचा निषेध

Next

उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाण्याचा निर्णय जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रद्द झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. मात्र, आमची पुन्हा एकदा दिशाभूल झाली असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सात दिवस झाले तरी याबाबत कोणताच शासकीय अध्यादेश निघाला नाही. शेतकरी नेत्यांनी आंदोलने केली. त्यामुळे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देत हा निर्णय रद्द झाल्याचे सांगितले. मात्र, आज सात दिवस उलटून गेले तरी याबाबत कुठलाच शासकीय अध्यादेश निघाला नाही. म्हणून मंगळवारी करमाळा - परांडा रस्त्यावर फिसरे येथे शेतकऱ्यांनी रात्री आठ वाजता टायर पेटवून सरकारचा निषेध करीत रस्ता रोखून धरला. करमाळा-भिगवण रोडवर पहाटे कोंढार-चिंचोली येथे टायर पेटवून निषेध नोंदवला.

----

फोटो २५करमाळा-निषेध

फिसरे येथे रस्त्यावर टायर पेटवून घोषणाबाजी करताना ग्रामस्थ.

Web Title: Protest of government by burning tires in Fisare, Kondhar Chincholi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.