सोलापूरातील महापालिकेच्या गाळे लिलाव विरोधात व्यापाºयांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:42 PM2018-07-05T14:42:13+5:302018-07-05T14:43:27+5:30
या आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते़ याचवेळी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़
सोलापूर : सोलापूर शहरातील महापालिकेच्या गाळे लिलाव विरोधात महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्यावतीने आज महापालिकेच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात शहरातील व्यापारी मोठया संख्येने सहभागी झाले होते़ याचवेळी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे़
महापालिका मेजर व मिनी गाळेधारक संघर्ष समितीतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करणाºया शिष्टमंडळाने सोलापूर महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन दिले़ यावेळी आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गाळ्यांच्या ई-निविदा पद्धतीविषयी माहिती समजावून सांगितली, परंतु व्यापारी ई-निविदा व्यापाºयांचा निविदा पद्धतीस विरोध असल्याचा ठाम निर्धार असल्याचे सांगितले़ रेडीरेकनर प्रमाणे भाडेवाढ घ्या, चर्चा करून निर्णय घेऊ असे भूमिका माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी मांडली, पण आयुक्त ढाकणे यांनी मी ई टेंडरवर ठाम असल्याचे सांगितल्यावर ९ जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सांगितले.