प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:20+5:302021-06-25T04:17:20+5:30
करमाळा : थकीत वेतनाच्या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या राणा नोबेल स्कूलच्या प्राचार्या बनश्री अशोक सूर्यवंशी यांची प्रकृती ...
करमाळा : थकीत वेतनाच्या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या राणा नोबेल स्कूलच्या प्राचार्या बनश्री अशोक सूर्यवंशी यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले.
राणा नोबेल स्कूलच्या प्राचार्या बनश्री सूर्यवंशी व त्यांचे पती अशोक सूर्यवंशी हे थकीत वेतन मागणीसाठी २० जूनला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. २२ जून रोजी त्यांना त्रास होऊ लागला. प्रशासनाने त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. कुटीर रुग्णालयातून त्यांना सोलापूरला हलविण्यात आले. ५ लाख ८५ हजार रुपये वेतन बनश्री सूर्यवंशी यांनी वारंवार मागणी करूनही विद्या विकास मंडळाकडून मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.
---
संस्थेत कार्यरत असणा-या कर्मचा-यांची कधीही तक्रार नव्हती. यांची संस्थेने नेमणूक केली असल्याबाबतची संस्थेकडे कुठलीही नोंद नाही. याउलट, संस्थेच्या इमारतीत त्या राहत असल्याने त्यांच्याकडेच संस्थेचे ६ ते ७ लाख रुपये भाडे येणे आहे.
- विलासराव घुमरे
सचिव, विद्या विकास मंडळ