विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल
By शीतलकुमार कांबळे | Updated: October 22, 2023 14:42 IST2023-10-22T14:42:05+5:302023-10-22T14:42:34+5:30
सोलापूर : विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल
सोलापूर : विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माजी नगरसेवक तौफिक शेख यानी सिध्देश्वर नगर, नई जिंदगी सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून, कोणतीही पूर्वपरवानगी न देता आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक तौफिक शेख, नुरूद्दीन मुल्ला, अबुबकर हारूण सय्यद, रफिक इनामदार, अब्दुल करीम शेख, असिफभाई राजे यांच्यासह अन्य पंधरा ते वीस जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस नाईक कृष्णात धोंडीबा कोळी यानी फिर्याद दिली आहे. तौफिक शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. लोकांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजपर्यंत विविध आंदोलन केली आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पेालिस निरीक्षक साळुंखे हे करीत आहेत.