आरोप सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देईन; अन्यथा त्यांनी बार्शी साेडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:22 AM2021-01-03T04:22:46+5:302021-01-03T04:22:46+5:30
बार्शी शहरात सुरू असलेली विविध विकासकामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे यांबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, अभियंता ...
बार्शी शहरात सुरू असलेली विविध विकासकामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे यांबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, अभियंता व प्रमुख ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, भारत पवार, पक्षनेते विजय राऊत, गटनेते दीपक राऊत, विजय चव्हाण, बापूसाहेब जाधव, ॲड. महेश जगताप, कय्युम पटेल, भैय्या बारंगुळे, अमोल चव्हाण, पाचू उघडे, काकासाहेब फुरडे, रितेश वाघमारे, मदन गव्हाणे, गणेश चव्हाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आमदार राऊत म्हणाले की, शहर व तालुक्यात विकासकामे करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच बार्शी नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली व सध्या सुरू आहेत; परंतु बार्शीतील राजकीय लोक, सतत सोशल मीडियावर विघ्नसंतोषी, प्रापंचिक व व्यावसायिक अपयशी, लायकी नसलेले लोक एखाद्या, दुसऱ्या टेक्निकल मुद्द्यावर तक्रारी करून, विकासकामांना खीळ बसवून नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यांनी व्यक्तिगत मला जरूर विरोध करावा; परंतु विकासकामांना विरोध करू नये, असे ते म्हणाले.
तसेच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी स्वतः बार्शी शहरात ‘आमदार आपल्या दारी’ अभियान राबविणार असल्याची माहिती आमदार राऊत यांनी दिली. शेवटी आमदार राजेंद्र राऊत यांनी विकासकामांना गती देऊन ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.
फोटो
०२बार्शी बैठक
ओळी
बार्शी येथे आयोजित बैठकीत विकासकामांचा आढावा घेताना आमदार राजेंद्र राऊत. त्याप्रसंगी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, कृष्णराज बारबोले, अमिता दगडे-पाटील व अन्य उपस्थित होते.