सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी ५० टक्के लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:41+5:302021-04-21T04:22:41+5:30

आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील कोरोना रूग्ण वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण पंढरपूर ...

Provide 50% of the approved vaccines for Solapur district | सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी ५० टक्के लस द्या

सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी ५० टक्के लस द्या

Next

आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील कोरोना रूग्ण वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. आजपर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क आला आहे. याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजाराहून अधिक रूग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात पंढरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे येथील जनता भयभीत झाली आहे. यामुळे वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यास मंजूर लसींपैकी ५० टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी आमदार परिचारक यांनी केली आहे.

लसीकरण केंद्रे वाढवा

पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात लस कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक आरोग्य केंद्रामधून परत जात आहेत. यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथे दोन लसीकरण केंद्रे वाढवावित. जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Provide 50% of the approved vaccines for Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.