रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या डेडिकेटेड सेवा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:41+5:302021-05-22T04:20:41+5:30
रेल्वे हॉस्पिटलमध्ये जर कोरोनाच्या डेडिकेटेड सेवा उपलब्ध झाल्या तर शहरातील नागरिकांबरोबरच येथील रेल्वेच्या विविध विभागाच्या सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना ...
रेल्वे हॉस्पिटलमध्ये जर कोरोनाच्या डेडिकेटेड सेवा उपलब्ध झाल्या तर शहरातील नागरिकांबरोबरच येथील रेल्वेच्या विविध विभागाच्या सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना कोरोना काळात सेवा उपलब्ध होणार आहेत. येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सध्या रेल्वे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पालकांना जनरल ओपीडी सेवा सुरू आहेत. कुर्डूवाडी शहराच्या सर्व दृष्टीने रेल्वे हा एक महत्त्वपूर्ण आत्मा आहे.
येथील रेल्वेच्या विविध सेवेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारी वर्गाचा शहरात आर्थिक, व्यापारी व उद्योग धंद्याला फायदा आतापर्यंत झाला आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉ. श्वेता मिसाला या अधीक्षक असून डॉ. जगदीश आर, डॉ. करिमन टी, डॉ. जगदीश गडेला हे चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. या दवाखान्यात सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वेच्या या हॉस्पिटलला कोविड डेडिकेटेड म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी जोर धरत असून त्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो - २० रेल्वे हॉस्पिटल
===Photopath===
200521\0427img-20210520-wa0237.jpg
===Caption===
कुर्डूवाडी रेल्वे हॉस्पिटल