वडापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:44+5:302021-05-09T04:22:44+5:30
सोलापूर : भीमा नदीवरील वडापूर बंधाऱ्याच्या पायथ्यातून पाण्याची मोठी गळती होत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करा, अशी ...
सोलापूर
: भीमा नदीवरील वडापूर बंधाऱ्याच्या पायथ्यातून पाण्याची मोठी गळती होत
आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करा, अशी मागणी करणारे
पत्र सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी पाटबंधारे विभागाला दिले
आहे. वडापूर बंधाऱ्याच्या तळातून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला लागलेली पाण्याची गळती थांबविण्यासाठी
ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. या गळतीमुळे
बंधाऱ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. बंधारा अपेक्षेपेक्षा
लवकर रिकामा होत आहे. बंधाऱ्यावर हजारो एकर क्षेत्र अवलंबून आहे. पाणी
वाहून गेल्याने पिके जळून जात आहेत. शेतकऱ्यांची सातत्याने तक्रार सुरू
आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली गळती थांबवली नाही. त्यामुळे
शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. वडापूर येथे नवीन बॅरेजेस उभारण्याच्या
नावाखाली बंधाऱ्याच्या गळतीकडे दुर्लक्ष होत असून, त्यासाठी खूप वेळ लागणार
आहे. बंधारा तातडीने दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि काम
लवकर करावे, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.
-----