करमाळ्यात भुयारी गटार योजनेसाठी निधी द्या : शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:27 AM2021-08-18T04:27:40+5:302021-08-18T04:27:40+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरातील रस्ते अरुंद झाले असून, गटारी बारीक झाल्यामुळे दुर्गंधी वाढत आहे तसेच गटारी ...

Provide funds for underground sewerage scheme in Karmala: Shiv Sena's demand | करमाळ्यात भुयारी गटार योजनेसाठी निधी द्या : शिवसेनेची मागणी

करमाळ्यात भुयारी गटार योजनेसाठी निधी द्या : शिवसेनेची मागणी

Next

या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरातील रस्ते अरुंद झाले असून, गटारी बारीक झाल्यामुळे दुर्गंधी वाढत आहे तसेच गटारी स्वच्छता करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे शहरात अस्वच्छता वाढून रोगराईचे प्रमाण वाढले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी करमाळा शहरातील संपूर्ण भुयारी गटार करणे गरजेचे आहे करमाळा नगरपालिकेचा भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा या आशयाचे निवेदन दिले आहे. विशेष निधी म्हणून करमाळा शहरात विविध भागात हायमास्ट दिवे बसवण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी शिंदे यांनी या सर्व प्रश्नाचा पाठपुरावा करून शक्य तेवढी मदत करु असे आश्वासन दिले.

----

Web Title: Provide funds for underground sewerage scheme in Karmala: Shiv Sena's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.