कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 03:02 PM2022-02-22T15:02:32+5:302022-02-22T15:02:41+5:30

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक विभागांनी कामात सातत्य ठेवावे. जिल्ह्यात ...

Provide immediate assistance to relatives of patients who have died of corona; Guardian Minister | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; पालकमंत्री

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; पालकमंत्री

googlenewsNext

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक विभागांनी कामात सातत्य ठेवावे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

 नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीष बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन 50 हजार रूपये देत आहे. जिल्ह्यात 11355 ऑनलाईन अर्ज आले असून यातील 6193 अर्ज स्वीकारले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन-चार अर्ज आले आहेत. यामुळे अर्जाची संख्या वाढत गेली आहे. कुटुंबातील नागरिकांनी एकच अर्ज भरावा. काही जणांनी ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध केली नसतील तर त्यांना पुन्हा संधी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

सद्यस्थितीत पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ या तालुक्यात रूग्णसंख्या जास्त वाढत आहे. सध्या 124 ग्रामीणमध्ये तर शहरात 42 असे 166 रूग्ण उपचार घेत आहेत. यातील 79 रूग्ण घरी उपचार घेत आहेत. रूग्णांची लक्षणे सौम्य असली तरी प्रत्येकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

 

Web Title: Provide immediate assistance to relatives of patients who have died of corona; Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.