शेतकऱ्यांच्या शेती पंपांना तातडीने वीज जोडणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:33+5:302021-08-15T04:24:33+5:30
मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत ठेकेदारांना पोल उभारणीसाठी रक्कम अदा करून या ठेकेदाराकडून वेळेत कामे पूर्ण करून न दिल्यामुळे ...
मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत ठेकेदारांना पोल उभारणीसाठी रक्कम अदा करून या ठेकेदाराकडून वेळेत कामे पूर्ण करून न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. ज्या वीज कनेक्शनधारकांना पुरेशा प्रमाणात वीज मिळायला पाहिजे होती त्या प्रमाणात ती मिळत नाही. त्यामुळे मंगळवेढा उपविभागाकडील अधिकृत परवारनाधारक ठेकेदारांना तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार, मारुती वाकडे, अप्पासाहेब चोपडे, राजाराम सूर्यवंशी, संदीप फडतरे, मुरलीधर घुले, दगडू पवार, माळी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::
उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांना निवेदन देताना दिलीप जाधव, नंदकुमार पवार, मारुती वाकडे, अप्पासाहेब चोपडे, राजाराम सूर्यवंशी, मुरलीधर घुले, संदीप फडतरे आदी.
130821\5401img-20210813-wa0030-01.jpeg
फोटो ओळी--उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांना निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव , तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार, मारुती वाकडे, आप्पासाहेब चोपडे, राजाराम सूर्यवंशी, मुरलीधर घुले,संदीप फडतरे,