आवश्यक साधने, व्यवस्था उपलब्ध करून द्या : भालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:10+5:302021-04-21T04:23:10+5:30
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानंतर स्व. आ. भारत भालके यांनी आमदार निधीतून जिल्ह्यात सर्वाधिक खर्च कोरोनाच्या निवारणार्थ केला ...
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानंतर स्व. आ. भारत भालके यांनी आमदार निधीतून जिल्ह्यात सर्वाधिक खर्च कोरोनाच्या निवारणार्थ केला होता. सध्या मंगळवेढा तालुक्यात कोविड केअर सेंटर तत्काळ उभे करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या कोविड केअर सेंटरमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आणखी ४०० लोकांची व्यवस्था होईल याबाबत विचार करावा, कोरोनाच्या गंभीर रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन आणि तत्सम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली असल्याचे भालके यांनी सांगितले.
तालुका आरोग्य विभागाने ग्रामीण भागात टेस्टिंग, ट्रेसिंग करण्यावर भर द्यावा, रुग्णाच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात ठेवावे, पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यात अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे भालके यांनी सांगितले.