एकरुखच्या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:26 AM2021-09-04T04:26:38+5:302021-09-04T04:26:38+5:30
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन ...
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन सप्टेंबर २०२० मध्ये कार्यान्वित झाला आहे. योजनेचे मुख्य कालवे झाले आहेत. परंतु वितरण व्यवस्थेची कामे अद्याप बाकी आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये १०० कोटी लागणार आहेत. कालव्याची कामे पूर्ण होऊन ७ हजार २०० क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व २१ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तरी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कालव्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आपण द्यावेत आणि १०० कोटींची तरतूद करून हा निधी तालुक्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
बोरी नदीवरील बबलाद येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत, तसेच या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अश्पाक बळोरगी, महेश वानकर, मोहन देडे, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.
......
दोन दिवसात सहा मंत्र्यांची भेट
अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामांसाठी माजी मंत्री सिद्धारम म्हेत्रे यांनी दोन दिवसात पाच मंत्र्यांची भेट घेऊन कामांच्या मागणीचे पत्र दिले. जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेण्यात आल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.
.......
फोटो ओळ
एकरुख योजनेच्या निधीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याही चर्चा करताना माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील आदी.
(फोटो ०२ चपळगाव म्हेत्रे
020921\5952img-20210901-wa0033.jpg
एकरूख योजना व बबलाद बंधाऱ्यासंबधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, मल्लिकार्जून पाटील व अन्य