बायपास रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी चार कोटींचा निधी द्या : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:08+5:302021-03-13T04:41:08+5:30
सांगोला नगरपालिकेच्या बायपास रस्ताच्या काँक्रिटीकरणासाठी चार कोटींचा व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागणी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शॉपिंग सेंटर, ...
सांगोला नगरपालिकेच्या बायपास रस्ताच्या काँक्रिटीकरणासाठी चार कोटींचा व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागणी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शॉपिंग सेंटर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे नूतनीकरण, नगरपालिका कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या फर्निचरसाठी व महात्मा जोतिबा फुले भाजी मंडई या ठिकाणी बहुपयोगी सभागृह या चार कामासाठी सात कोटी असे एकूण ११ कोटींचा निधी त्वरित मंजूर केला जाईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या विविध कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. सांगोला शहरातील बायपास रस्त्याची सध्या खूपच दुरवस्था झाली आहे. नगरपालिकेकडे निधीची कमतरता असल्याने व शहरातील नागरिकांची बायपास रस्ता दुरुस्तीची आग्रही मागणी असल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांनी खास बाब म्हणून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.