धोका टाळण्यासाठी शाळा मंदिरात निवाऱ्याची सोय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:16+5:302021-07-24T04:15:16+5:30

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व ...

Provide shelter in the school temple to avoid danger | धोका टाळण्यासाठी शाळा मंदिरात निवाऱ्याची सोय करा

धोका टाळण्यासाठी शाळा मंदिरात निवाऱ्याची सोय करा

Next

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा. वेळोवेळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.

नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदिर या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील, याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केल्या.

ग्रामस्तरीय समितीने सतर्क राहावे

आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क रहावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे. तसेच महसूल, पोलीस, लघुपाटबंधारे, जलसंधारण, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे, अशा सूचनाही सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

Web Title: Provide shelter in the school temple to avoid danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.