शाहीर अमर शेख स्मारकासाठी जागा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:51+5:302021-02-15T04:20:51+5:30

येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या समारोपप्रसंगी वरील ठराव मंजूर केले. अध्यक्षस्थानी शरद ...

Provide space for Shahir Amar Sheikh Memorial | शाहीर अमर शेख स्मारकासाठी जागा द्यावी

शाहीर अमर शेख स्मारकासाठी जागा द्यावी

Next

येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या समारोपप्रसंगी वरील ठराव मंजूर केले. अध्यक्षस्थानी शरद गोरे होते. व्यासपीठावर कवी फुलचंद नागटिळक, राजा माने, शोभाताई घुटे, महारुद्र जाधव उपस्थित होते. समारोपप्रसंगी कवी फुलचंद नागटिळक, साहित्यिक शरद गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी शनिवारी या संमेलनाचा शुभारंभ ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी निमंत्रक डाॅ. बी. वाय. यादव, माजी आ. धनाजी साठे, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पद्माकर

कुलकर्णी, विलास जगदाळे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सोमेश्वर घानेगावकर उपस्थित होते.

प्रारंभी भगवंत मंदिरासमोरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अनंत बिडवे यांच्या हस्ते, तर ग्रंथपूजन हभप विलास जगदाळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. राहुल जगदाळे निर्मित डाॅ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले.

यांचा झाला सन्मान

बालाजी जाधवर (अध्यात्म), साची वाडकर (वैमानिक), सदाशिव पडदुणे (उपजिल्हाधिकारी, लातूर), सुर्डी (कृषी पाणी दार गाव), प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर (सामाजिक), स्वामी विवेकानंद

सार्वजनिक वाचनालय, पांगरी (ग्रंथालय) यांचा सन्मान झाला.

फोटो

१४बार्शी - सत्कार

बार्शी येथे आयोजित अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध संस्था, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Provide space for Shahir Amar Sheikh Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.