अर्थसंकल्पामध्ये सीना माढा योजनेसाठी ५० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:33+5:302021-03-10T04:23:33+5:30

माढा तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेली सीना-माढा योजना कार्यान्वित झाली योजना असून, यामध्ये मुख्य कालवा पाइपलाइन वितरिका PDN बंद नलिकाप्रणालीद्वारे ...

Provision of Rs. 50 crore for Sina Madha scheme in the budget | अर्थसंकल्पामध्ये सीना माढा योजनेसाठी ५० कोटींची तरतूद

अर्थसंकल्पामध्ये सीना माढा योजनेसाठी ५० कोटींची तरतूद

Next

माढा तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेली सीना-माढा योजना कार्यान्वित झाली योजना असून, यामध्ये मुख्य कालवा पाइपलाइन वितरिका PDN बंद नलिकाप्रणालीद्वारे भिजणारे क्षेत्र आवश्यक त्या ठिकाणी पूल आदी कामे झाली आहेत. या योजनेवरील आजपर्यंत जवळपास १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असल्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

सीना-माढा योजनेबद्दल बोलताना आ. शिंदे म्हणाले की, या योजनेतील कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ५० कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याने या निधीतून राहिलेले पोटफाटे याबरोबरच मुख्य कॅनॉल ज्या ठिकाणी जास्त प्रमाणावर पाझरत आहेत तेथे लायनिंग करणे, नवीन गेट बसविणे, जुन्या गेटच्या दुरुस्त्या PDN मधील उर्वरित कामेही पूर्ण होणार आहेत.

त्यामुळे पुढील काळात सीना-माढा योजनेचे उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीचा भूसंपादन मोबदला मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता भीमानागर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असेही आ. शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

उर्वरित चार हजार हेक्टरही येणारे ओलिताखाली

राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या नियोजनाच्या अभावामुळे बंद अवस्थेत आहेत.

मात्र, राज्य शासनाच्या ताब्यातील सीना- माढा उपसा सिंचन ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन चालविलेली आहे. सुमारे १६ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामधील आतापर्यंत १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाल्यामुळे दुष्काळी माढा तालुक्याचा कायापालट होण्यास मदत झाली आहे. उर्वरित ४ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्यासाठी चालू वर्षी ५० कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली आहे. या योजनेत बावी, तुळशी, अंजनगाव खे., परितेवाडी या गावांचा समावेश होण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक लावणार असल्याचे

आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.

---

Web Title: Provision of Rs. 50 crore for Sina Madha scheme in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.