गावाकडे ट्रॅक्टर चालवित तो झाला पीएसआय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:13 PM2019-03-18T18:13:42+5:302019-03-18T18:15:40+5:30
राजीव लोहोकरे अकलूज : घरची हालखी परस्थिती त्यात वाट्याला शैक्षणिक अपयश़ गावाकडे टॅक्टर चालविला, हाती मिळेल ते काम केले, ...
राजीव लोहोकरे
अकलूज : घरची हालखी परस्थिती त्यात वाट्याला शैक्षणिक अपयश़ गावाकडे टॅक्टर चालविला, हाती मिळेल ते काम केले, पण पीएसआय होण्याची जिद्द सोडली नाही. अशा जिद्दी आणि जीवनात खडतर प्रवास करणाºया तरुणाचे नाव आहे किशोर चव्हाण.
किशोरचे मूळ गाव तोंडले-बोंडले (ता. माळशिरस). मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म़ पोलीस खात्यात अधिकारी होण्याची प्रबळ इच्छा होती. पण परिस्थिती बेताचीच़ माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेताना १२ वीत नापास़ पुढेचे शिक्षण सोडले, पण पोलीस अधिकारी होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती़ पुन्हा १२ वी परीक्षा देवून उत्तीर्ण झालो़ परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. ट्रॅक्टर चालविला, दोन वर्षे शेती केली, यश आले नाही. पुढे तीन वर्षांनी पदवी पूर्ण केली.
२ ते ४ गुण कमी मिळाले; पदरी निराशाच
पदवीनंतर गावातल्या सोसायटीत लिपिक म्हणूनही काही दिवस नोकरी केली. पोलीस खात्यात जाण्यासाठी दोन वेळा पोलीस भरतीला गेलो, केवळ २ ते ४ गुण कमी मिळाल्याने अपयश पदरी निराशा आली. कधी पूर्व परीक्षेला यश पण मुख्य परीक्षेत अपयश यायचे. दोन वेळा नापास झालो. परंतु निराश झालो नाही़ अभ्यास करीत राहिलो, मनाशी जिद्दीच बाळगली होती की अधिकारी होवूनच परतायचे. याच जोरावर २०१७ च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली अन् तिसºया प्रयत्नात यश मिळाले.
गावात वाया गेलेले पोर म्हणनारे लोक आता साहेब म्हणून हाक मारु लागले़ यातच सार काही आल. या यशामधे शंकरराव मोहिते महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे़ कारण आयुष्याची महत्वाची वळणे इथच शिकलो़ अभ्यासाची प्रेरणा इथेच मिळाली. जीवनातील पारिजात बहरला. जरी मी पुण्यात बहरलो असलो तरी माझ्या जीवनाच्या वेलावरील प्राजक्ताची फुले ही शंकरराव मोहिते महाविद्यालयातच लागली होती. हिरोगिरी करून झिरो होण्यापेक्षा झिरोतून हिरो व्हायचे़ आई वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असा विचार घेवून जीवनाची यशस्वी वाटचाल करीत आहे.
- किशोर चव्हाण़, पोलीस उपनिरीक्षक